Saturday, December 21, 2024

तुमच्याकडून ही चुकीच्या UPI आयडीवर पेमंट गेले तर परत कसे मिळवायचे ? जाणून घ्या प्रक्रिया

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्याच्या काळात भारतात UPI पेमंटचा वापर झपाट्याने वाढला आहे. या पेमेंटसाठी आपल्याकडे फक्त स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. UPI पेमंटच्या सुविधेमुळे

पैसे सोबत बाळगावे लागत नाहीत. त्यामुळे पैसे हरवतील किंवा चोरी होतील याचं टेन्शन राहिलेलं नाही. मात्र अनेकदा सर्व्हर डाउन असल्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो.

UPI द्वारे पेमेंट करत असताना अनेकदा चुकीच्या UPI आयडीवर पैसे जातात त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत काय करावे हे अनेकांना समजत नाही.

तुम्ही घाबरू नका, यावेळी काय करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले, तर Google Pay, PhonePe आणि Paytm हे

ॲप्स जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधा. बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा आणि याबाबत सविस्तर माहिती द्या. हा पर्याय उपलब्ध नसल्यास बँकेला मेल करा,

या मेलमध्ये ट्रांझॅक्शन आयडी आणि इतर तपशील नमुद करा. यामुळे तुमचे पैसे परत मिळण्यास मदत होऊ शकते.अशा प्रकरणाची तक्रार तुम्ही NPCI पोर्टलवर करू शकता. यासाठी सर्वप्रथम

NPCI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर What we do या टॅबवर क्लिक करा. यानंतर UPI वर टॅप करा आणि Dispute Redressal Mechanism वर क्लिक करा. यात तुम्हाला UPI

ट्रांझॅक्शन आयडी रक्कम, ट्रान्सफर झालेली रक्कम, व्यवहाराची तारीख, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर ही माहिती भरा. यानंतर Incorrectly transferred to another account

हे कारण सिलेक्ट करुन सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुमचे पैसे परत मिळू शकतात.वरील सर्व पद्धती वापरल्यानंतर समस्या न सुटल्यास 30 दिवसांनंतर बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता.

यासाठी तुम्हाला तक्रार कागदावर लिहावी लागेल आणि ती पोस्ट/फॅक्स किंवा लोकपाल कार्यालयाला भेट देवून अधिकाऱ्यांकडे द्या, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!