माय महाराष्ट्र न्यूज:आपण मागच्या एक महिन्यापासून चर्चा करत होतो, की फेब्रुवारीत कापूस बाजारातील चित्र दोन गोष्टींमुळे बदलू शकतं.
आता कापसाच्या भावात तेजी येण्याला आता सुरुवात झाली. कारण कापसाचे भाव क्विंटलमागं २०० रुपयांनी वाढले.आता पुढील महिनाभरात कापसाचा भाव ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठू शकतो.
तर मे महिन्यापर्यंत कापूस ८ हजारांच्याही पातळीवर पोहचू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील कापसाचे भाव पुढील महिनाभरात सध्याच्या भावावरून किमान १० टक्क्यांपर्यंत
वाढू शकतात. मग सध्याचा भाव किती आहे? तर आजचा भाव आहे सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये. आता पुढील महिनाभरात सध्याच्या भावावरून १० टक्के म्हणजेच किती तर ६०० ते ७०० रुपये.
म्हणजेच पुढच्या महिनाभरात कापूस ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे. तर मे महिन्यापर्यंत कापसाचा भाव किमान ७५ टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणजेच सध्या भावात किमान
१ हजार ते १२०० रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. आता तुम्ही म्हणाल सरकारच काय? भाव वाढले तर सरकार आयात नाही का करणार? पण एका गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे कापूस
आयात यंदा एवढी सोपी राहणार नाही. सरकारने आयातशुल्क काढले तरीही. कारण आपल्या कापसाचे भाव सध्या किती आहे ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपये.पण जर आपल्याला सध्या भारतात कापूस आयात करायची असेल
तर कापसाचा भाव पडतो ८ हजार ५०० रुपये. म्हणजेच आपल्या कापसाच्या भावापेक्षा किमान १५०० रुपये जास्त आहे. त्यावर ११ टक्के शुल्क वगळेच. सध्याचे ११ टक्के शुल्क गृहीत धरले तर हा भाव
९ हजार ३५० रुपये होतो. मग देशातच स्वस्त कापूस मिळत असताना कोणता व्यापारी आयात करणार? शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी राॅयटर्समध्ये बातमी दिली होती की फेब्रुवारी महिन्यात
४ लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झाले. म्हणजेच भारत तब्बल दोन वर्षानंतर एवढा कापूस एका महिन्यात निर्यात करणार आहे. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम भारताकडून जास्तीत जास्त कापूस खरेदी करत आहेत.
चीनने आधी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला आहे. आता अमेरिकेच्या कापसाचे भाव वाढले. त्यामुळे चीन भारताकडे वळला. चीनने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतातून ३ लाख गाठी
कापूस आयातीचे करार केले आहेत. तर मार्च महिन्यातही भारतातून ३ लाख गाठी कापूस निर्यात होऊ शकतो, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.




