Saturday, December 21, 2024

आधार कार्डबाबात महत्त्वाची बातमी, जन्मतारखेचा पुरावा म्हणून लवकरच घेणार मोठा निर्णय

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांच्या ओळखपत्रांचे काम करते. हे कार्ड महत्त्वाच्या डॉक्यूमेंटसारखे आहे. मोबाइलच्या सिम कार्डपासून ते एखादे सरकारी काम करण्यापर्यंत याचा वापर होतो.

 

अशातच आधार कार्डबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सार्वजनिक आणि सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर कमी

 

करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे.आधार कार्ड हे बायोमेट्रिक लिंक केलेला ओळख पुरावा म्हणून काम करते. ज्यामध्ये पॅन कार्ड, पीएफ, बँक (Bank) आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींशी जोडले गेले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाने देखील महाराष्ट्र विरुद्ध यूआयडी आणि इतर प्रकरणांमध्ये म्हटले की, आधार क्रमांक जन्म प्रमाणपत्र म्हणून नाही तर ओळखपत्र म्हणून वापरण्यात यावे.UIDAI च्या परिपत्रकात

 

सांगितले की, आधाक क्रमांकाचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख प्रस्थापित करण्यासाठी केला जाऊ शकतो परंतु तो जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही. यापुढे जन्मतारखेची नोंदणी जन्मप्रमाणपत्र

 

किंवा शाळा सोडल्याचा दाखला यांसारख्या कागदपत्रांचा वापर करुन पडताळणी केली जाऊ शकते. त्यामुळे अचूक वय जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचे वय जाणून घेण्यासाठी

 

पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील वापरता येईल असे द हिंदूने आपल्या वृत्तपत्रात सांगितले आहे.यापूर्वीच EPFO सारख्या काही संस्थांनी जन्मतारीखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड रद्द केले आहे. केंद्रीय

 

कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, आधार कार्ड सुमारे ५९ कोटी पॅन कार्डशी जोडले आहे. त्यामुळे UIDAI च्या आदेशामुळे उद्भवलेल्या समस्यांचे मूल्यांकन केले जाईल.जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी आधारचा वापर केला जात आहे.

 

परंतु, यामध्ये जन्मतारीख महत्त्वाची मानली जात नाही. त्यामुळे आधार कार्ड आणि जन्मतारखेबद्दल सरकार कोणाता मोठा निर्णय घेणार हे पाहाणे गरजेचे आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!