Friday, April 17, 2026

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी:मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने…

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठा आरक्षण विधेयक आज(दि.२०) विधानसभा सभागृहात एकमताने मंजूर झाले. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशनात आज आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये हे विधेयक एकताने मंजूर झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणासाठी मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधानसभेने आज मांडण्यात आसे.

यानंतर हे विधेयक विरोधकांसह सत्ताधारी आमदारांच्या एकमताने मंजूर झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या पटलावर ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं

मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा,

असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे, असं जाहीर केलं.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही देत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन

बोलावलं. यामध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानंतर सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. त्याला मंत्रिमंडळ मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मांडलं.

मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकणारच. राज्य सरकारने घेतलेला निर्णय मोठा आणि धाडसी निर्णय आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!