माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आणखीन एक राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. ही चर्चा सुरू होण्याचं कारण ठरलं अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांचा दावा.
काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकर अजित पवार गटात प्रवेश करतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना अमोल मिटकरींनी हा दावा केलाय. काँग्रेस पक्षाचे ७ आणि शरद पवार गटाचे ५ आमदार लोकसभा निवडणूकीपूर्वी अजित पवार गटात येतील, असा
दावा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालीय. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेते भाजपची वाट धरू लागले आहेत. त्याचप्रमाणे
राज्यातील महायुतीतही मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे.मिटकरींनी बारामतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल, तसेच लोकसभेच्या जागा कितमी मिळाव्यात याचे सुतोवाच केले आहे. बारामतीत अजित पवार
दादा म्हणतील ते होईल. तिथला सगळं विकास दादांनी केलाय. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचं मिटकरी म्हणाले. लोकसभेला १० जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह असल्याचं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत अजित गटात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.