माय महाराष्ट्र न्यूज:कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्याच्या पगारात
भरघोस वाढ होणार आहे. कंपन्या यावर्षी नोकरदारांच्या पगारात १० टक्के पगार वाढ करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरींग क्षेत्रातील नोकरदाराच्या
पगारात सर्वाधिक वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.कन्सल्टन्सी फर्म मर्सरने टीआरएसच्या नावाने एक सर्व्हे जाहीर केलाय. या सर्व्हेनुसार, २०२४मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरदाराच्या
पगारात १० टक्के वाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मागील वर्षी ९.५ टक्क्यांनी पगारात वाढ झाली होती. भारतातील वाढती मजबूत अर्थव्यवस्था नवीन शोध आणि टॅलेट हबच्या पार्श्वभूमीवर
ही पगार वाढ होणार असल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आलाय. सर्वेक्षणानुसार, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी आणि जीवन विज्ञान (लाइफ सायन्स) क्षेत्रात काम
करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सर्वाधिक वाढ होणार आहे.हा सर्व्हे ऑगस्ट २०२३ मध्ये करण्यात आला. यात २१ लाख नोकरदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ६००० जॉब्स रोल्सच्या १४७४ कंपन्यातून
डेटा गोळा करण्यात आलाय. या सर्व्हेत वेगवेगळ्या क्षेत्रातील इंडस्ट्रीमधील पगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय. तसेच यात कर्मचाऱ्यांची कामगिरी, संस्थेचा कामगिरी (ऑर्गनाइजेशन परफॉर्मेंस) आणि पद
या तीन घटकांच्या आधारे पगार वाढीची पातळी निश्चित करण्यात आलीय.सर्व्हेनुसार, २०२४ मध्ये पगारात (Salary) सरासरी १० टक्क्यांची वाढ असेल. मागील वर्षी पगारवाढ फक्त ९.५टक्के राहिली होती.
या सर्व्हेत नोकरी (Job) सोडून जाणाऱ्याचा दरदेखील जाहीर केलाय. सर्व्हेनुसार, रेट ऑफ वोंल्ट्री एट्रीशन म्हणजेच कंपनी सोडून जाणाऱ्यांचा दर २०२१ मध्ये १२.१ टक्के होता. २०२२ मध्ये यात वाढ झाली असून हा
दर १३.२ टक्के इतका झाला. यामुळे नोकरी सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढलीय.पगारवाढीचा अंदाज चांगला आर्थिक निर्देशक आणि व्यावसायिक लँडस्केपमुळे भारतीय बाजारपेठेतील वाढता
आत्मविश्वास आणि आशावाद प्रतिबिंबित करत असल्याचं भारतातील मर्सरच्या रिवॉर्ड्स कन्सल्टिंग लीडर मानसी सिंघल म्हणाल्यात.