माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:टाकळीमिया ( वार्ताहर ) राहुरी तालुक्यातील टाकळीमियातील मोरवाडी येथे ओमसाई प्रतिष्ठान व मोरवाडी
ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.०८/०३/२०२४ ते शुक्रवार दि.१५/०३/२०२४ या काळात साईचरित्र पारायण व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.राहुरी तालुक्यात होत असलेल्या या सोहळ्याला तालुक्यातुन व गावा गावातुन वारकरी व भक्त परिवार येत
असतो त्यामुळे जास्तीत जास्त साई भक्तांनी उपस्थित रहावे यामध्ये ०७ फेब्रुवारीला रोजी सकाळी १० वा. ध्वजारोहण व सायंकाळी ०४ वा.शिर्डी वरुन आनलेल्या साईंच्या मुर्ती चा अभिषेक करुन मिरवणूक होईल हे या सोहळ्याचे ९ वे वर्ष आहे .
तरी याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे अहवान सप्ताह कमेटी कडून करण्यात आले आहे.दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा भजन,साई चरित्र पारायण, सायं.हरिपाठ,रात्री ०७ते ०९ किर्तन व महाप्रसाद असे असुन पारायण नेतृत्व ह.भ.प. उदय महाराज घोडके व हभप आसराबापु चिंधे हे करीत आहेत.
याकाळात भागवताचार्य हभप अण्णासाहेब महाराज लोंढे, भागवताचार्य हभप शिवानंद महाराज पाटील नाशिक , हभप शिक्षणाधिकारी हभप जाधव गुरुजी बीड, समाज प्रबोधनकार विनोदाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर, किर्तनकेसरी हभप वैजनाथ महाराज जगदाळे पंढरपूर,
वाणीभुषण हभप प्रमोद महाराज जगताप बारामती, विदर्भरत्न पद्माकर महाराज देशमुख अमराउ, हे किर्तनरूपी सेवा बजावणार आहेत. तसेच गुरुवार दि १४ रोजी सायं.ग्रंथाचीभव्य मिरवणूक व दीपप्रज्वलन होणार आहे . तर शुक्रवार दि.१५ रोजी सकाळी ०९ ते ११ हभप शांतीब्रम्ह महंत आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड यांचे काल्याचे किर्तन
होऊन महाप्रसादाने कार्यक्रमची सांगता होणार आहे.
या काळात पारायण वाचकांना चहा नाष्टा गोरक्षनाथ मोरे, दिलीप गोसावी, मच्छिंद्र अनपट , सुरेश गोसावी, मच्छिंद्र गोसावी ,पोपट गोसावी, अविनाश बन, आदिनाथ मुळे, बाबासाहेब जंजिरे, बाळासाहेब गोसावी , हे तर सायंकाळी आन्नदान रज्जाक शेख,
बाळासाहेब मोरे, बापुसाहेब शिंदे,अमोल मोढे,आसराबापु चिंधे,शुभम गोसावी, संदेश गोसावी, भाऊसाहेब मोरे, सुशांत भिंगारकर गोरक्षनाथ भुसारे , ज्ञानदेव निमसे, धनाजी खामकर, दत्तात्रय काळे, डाॅ सुभाष गोसावी, रामदास गोसावी, जनार्दन मोरे, आप्पासाहेब माळवदे, रामचंद्र गोसावी हे अन्नदान करणार असून बाबुराव कुमटकर
आसराबापु चिंधे, अशोक मोरे, शिवाजी मोरे,जालिंदर मोढे, रमेश मोरे, काकासाहेब शिंदे , किशोर मोरे हे संतपूजन करणार आहेत, तसेच मियासाहेब पतसंस्था,आनंदी वाॅटर,साईराज वाॅटर सप्लायर्स हे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर उपलब्ध करुन देत आहे.
प्रतिक घोरपडे पाण्याचे जार उपलब्ध करणार आहे तर दिलीप गोसावी, दत्तात्रय गोसावी व सुनिता ताई तनपुरे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई प्रतिष्ठाण ,सप्ताह कमेटी व मोरवाडी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत