माय महाराष्ट्र न्यूज:कांदाबाजारभावात सुधारणा होत असल्याचे आजच्या सकाळच्या बाजारभावावरूनदिसून येत आहे. आज सकाळी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश बाजार
समित्यामध्ये सकाळ सत्रातील कांदा लिलाव पार पडले आहेत. सकाळ सत्रातील बाजार अहवालानुसार पुणे बाजार समितीत सर्वाधिक 19 हजार 363 क्विंटलची आवक झाली. तर सकाळ सत्रातील
सर्वात कमी 1000 रुपयांचा दर पुणे- मोशी बाजार समितीत मिळाला आहे. 11 मार्च रोजी सकाळ सत्रातील लिलाव पार पडले असून जवळपास 35 हजार क्विंटल हुन अधिक कांद्याची आवक झाली.
यात पुणे, पुणे-मोशी, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचा समावेश आहे. सकाळ सत्रातील सर्वात कमी आवक पुणे पिंपरी बाजार समितीत केवळ 4 क्विंटलची आवक झाली. तर या बाजार समितीत सरासरी
1600 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत 2500 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 1600 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ
कांद्याची 1500 क्विंटल कांद्याची आवक झाली असून सरासरी 1625 रुपये दर मिळाला. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची 320 नग आवक झाली. या
ठिकाणी सरासरी 1811 रुपये बाजारभाव मिळाला. उन्हाळ कांद्याची 227 नग आवक झाली. या कांद्याला सरासरी 1780 रुपये दर मिळाला. जवळपास दोन्ही कांद्याची दहा हजार क्विंटलची आवक सकाळ
सत्रात झाली. लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या निफाड आवारात सकाळ सत्रात लाल आणि उन्हाळ कांदा मिळून 451 नग कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला
सरासरी 1850 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1700 रुपये मिळाला.