माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतेय.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता (Maharashtra Weather) वर्तविली जात आहे. हवामान विभागाने १६ व १७ मार्चला विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तिवली आहे.
राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे.
मोठ्या प्रमाणात आता उन्हाच्या झळा जाणवत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या वर सरकले आहे.मार्च आणि एप्रिल महिन्यात यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा
अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यात पुण्यासह संपूर्ण राज्यातील तापमान कोरडे होते. कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. दिल्लीत देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशमध्ये
चक्राकार वाऱ्याच्या स्थिती आहेत.महाराष्ट्र राज्यातून थंडीने काढता पाय घेतला आहे. उकाड्यात वाढ झालीय. विदर्भ ते कोकणापर्यंत तापमानवाढ झाल्याचं दिसतंय आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या
तापमानवाढ झाली (Summer Season) आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही तापमानात वाढ होतेय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती आहे.
आता एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत काय स्थिती असेल, असा प्रश्न पडत आहे.