Sunday, December 22, 2024

११ राज्यांना तुफान पावसासह गारपिटीचा इशारा; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मार्च महिना सुरू होताच देशातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा बसत असून उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेलाय. दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये अजूनही अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत‌.वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या

प्रभावामुळे पुन्हा एकदा उत्तर-पश्चिम भारतातील हवामान बदलणार आहे. सध्या देशाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसांत काही भागांना अवकाळी

पावसासह (Heavy Rain Alert) गारपिटीचा तडाखा बसणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.IMD अंदाजानुसार, बुधवार १३ मार्च आणि गुरुवार १४ मार्च रोजी जम्मू आणि काश्मीर,

लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. याशिवाय पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या

भागात १३ मार्च रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १४ मार्चपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. १३ मार्च ते १७ मार्च दरम्यान गंगेच्या पश्चिम बंगाल

प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (Rain Update) वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर १४ ते १७ मार्च या कालावधीत ओडिशामध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

१६ मार्च आणि १७ मार्च रोजी झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील

तीन दिवसांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातही हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.महाराष्ट्राबाबत

बोलायचं झाल्यास, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो, असं

हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता नाही, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!