नेवासा:नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साजरी करण्यात येणाऱ्या हनुमान जयंती निमित्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी भागवताचार्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
भेंडा येथील पावन दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव नियोजनाची बैठक दि.१४ मार्च रोजी सांय.६ वाजता पार पडली.
यावेळी माजी उपसभापती तुकाराम मिसाळ,माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय काळे,माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे,शिवाजी तागड, बापूसाहेब नजन,भेंडा सोसायटीचे माजी अध्यक्ष नामदेव निकम,भाऊसाहेब फुलारी, सुनील गव्हाणे, विजय चौधरी, दादा गजरे, संतोष मिसाळ, डॉ लहानु मिसाळ, किशोर मिसाळ, कारभारी गरड,वाल्मीक लिंगायत, विश्वास कोकणे, शिवाजी फुलारी, श्रीपतराव फुलारी, संदीप फुलारी, राजेंद्र भालसिंग,रविंद्र दोले गुरुजी, संतोष मिसाळ,राजू चिंधे, राजू तागड, एकनाथ गव्हाणे, अमोल जोगदंड, ताराचंद मिसाळ, देवेंद्र काले, गणेश महाराज चौधरी, योगेश निकम,भीमराज मिसाळ, तात्या फूलमाली, अशोक लोहकरे, राजेंद्र नवले, आदी उपस्थित होते.
श्रीसंत नागेबाबांच्या पावन भुमीत मंहत भास्करगिरीजी महाराज, गुरूवर्य मिराबाई महाराज मिरीकर , महंत सुनिलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षी भेंडा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दि.१६ ते २२ एप्रिल या कालावधीत
भव्य हनुमान जयंती उत्सव होत आहे.
सोमवार दि.१८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मध्वजारोहण होणार आहे.
भास्करगिरीजी महाराज यांचे हस्ते व
महंत सुनिलगिरीजी महाराज,महंत आप्पा महाराज,गणेशानंदगिरीजी महाराज यांचे उपस्थितीत होणार आहे.
यावर्षी भागवताचार्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या
सुमधुर वाणीतुन दरोरज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीमद् भागवत होणार आहै.२३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
हनुमान जयंती साठी श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट, ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळ, समता मल्टीस्टेट, सिद्धविनायक पतसंस्था,घुले पाटिल पतसंस्था यांचेसह पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ, व्यापारी व हनुमान भक्त परिवार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
हनुमान मंदिर परिसर स्वच्छता , अन्नदान व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ,महिला भाविकांची सुरक्षा,लाईट व्यवस्था यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाने केले आहे.