नेवासा
नेवासा पोलीसांनी नेवासा खुर्द शहरातील कुरेशी मोहल्ला परीसरात छापेमारी करुन एकुण ३ लाख रुपये किंमतीचे गोवंश मांस, एक ५ लाख रुपये किंमतीची इंनोव्हा कार, गोवंशीय जनावरे कापण्यासाठी लागणारे हत्यारे व १ हजार रुपये किंमतीचा वजनकाटा जप्त केला आहे.
याबाबद मी पोहेका गणेश अप्पासाहेब फाटक (वय ४० वर्षे) नेमणुक नेवासा पोलिस स्टेशन सरकार तर्फे फिर्याद दिली आहे की,दि. २० मार्च २०२४ रोजी रात्री ०९.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरेश गल्ली परिसरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल चालु असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेवरुन त्यांनी तात्काळ पथक तयार करुन त्यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. सदर पथकाने कुरेशी गल्ली परीसर नेवासा खुर्द येथे टाकलेल्या छाप्यात २००० किलो वजनाचे प्रति किलो १५० रुपये प्रमाणे एकूण ३ लाख रुपयांचे गोमांस पत्र्याचे शेडमध्ये व ईनोव्हा कारमध्ये मिळून आलेले, १०० रुपये किंमतीचे सुरा व चाकु यांना धार लावण्याची कानस, ३०० रुपये किंमतीचे तीन लोखंडे सुरे, १००० रुपये किमतीचा ईलेक्ट्रॉनिक वजन काटा व ५ लाख रुपये किंमतीची ईनोव्हा कार तिचा पासिंग क्रमांक एमएच ०१ एनएच ९४४२ अशा मुद्देमालांसह आरोपी नामे अन्सार सत्तार चौधरी व आरीफ अमदार कुरेशी दोघे रा. कुरेशी मोहल्ला नेवासा खुर्द ता. नेवासा जि. अहमदनगर हे मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द पोका गणेश अप्पासाहेब फाटक यांनी भारतीय दंड संहिता कलम २६९, ३४ सह महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे सुधारित सन २०१५ चे कलम ५ (क), ९ (अ) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली असुन त्याचा पुढील तपास पोना संतोष धोत्रे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक नगर प्रशांत खैरे व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्रीमती वैभव कलुबमें व उप विभागीय पो. अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, अंमलदार पोहेकॉ संतोष राठोड, पोहेकॉ बबन तमनर, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ अरविंद वैद्य, पोकॉ गणेश फाटक, पोकॉ अप्पासाहेच तांबे, पोकॉ गणेश जाधव यांनी कलेली आहे.