नेवासा
नेवासा तालुक्यातील वाकडी येथील श्रीकांत पांडुरंग गायकवाड (वय 62 वर्ष) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी,भाऊ, पुतणे, सुन,नातवंडे असा परिवार आहे.वाकडी येथील शांतिदूत वाचनालयाचे ग्रंथपाल महेश गायकवाड यांचे ते वडील, भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे हिशोबनीस अर्जुन गायकवाड यांचे ते बंधू तर माळीचिंचोरा येथील पत्रकार ज्ञानेश्वर चौधरी यांचे ते सासरे होत.




