Sunday, December 22, 2024

आ.गडाख-घुलेंच्या नेतृत्वाखाली  खरेदी-विक्री संघ सभासदांना शेतीपूरक सेवा देणार-प्रभाकर कोलते

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नफ्यात आला असून संस्थेला ऑडिटमध्ये सलग पाच वर्षे ‘अ’ वर्ग मिळाला आहे. माजी मंत्री आ.शंकरराव गडाख व माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघ सभासदांना शेती पूरक सेवा देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते पाटील यांनी दिली.

नेवासा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवार दि.१९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते पाटील यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.उपाध्यक्ष संतोषशेठ फिरोदिया यांनी स्वागत केले. संचालक दिपक चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारुन संस्था नफ्यात आल्याबद्दल व संस्थेला ऑडिटचा ‘अ’ वर्ग मिळाल्याबद्दल गफूरभाई बागवान व माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे यांनी सभेत अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

यावेळी माजी प्राचार्य रघुनाथ आगळे,
माधवराव शिंदे, भाऊसाहेब आगळे, अशोक नांगरे, मुळा कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे,निलेश पाटील, सतीश चुत्तर, दत्तात्रय शेटे, आबासाहेब अकोलकर, संजय गव्हाणे,
संघाचे संचालक रविंद्र मारकळी, सोपान चौधरी, निवृत्ती थोपटे, राजेंद्र पोतदार, सुभाष चव्हाण, विजुचंद चरवंडे,कैलास काळे, मच्छिंद्र कडु,बादशहा इनामदार, रमेश गोर्डे, जनार्धन पिटेकर आदी सभेस उपस्थित होते.

प्रारंभी संघाचे व्यवस्थापक अशोकराव पटारे यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची हिशोपत्रके,ताळेबंद, नाफा-तोटा पत्रके सभेत वाचून दाखविली, त्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
संघाचे संचालक युवराज तनपूरे यांनी आभार मानले.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!