Saturday, December 21, 2024

शेवगाव येथील शिव पुराण कथा ४ थे पुष्प…मनुष्याने व्यर्थ बडबड करू नये-समाधान महाराज शर्मा

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव/अविनाश देशमुख

मनुष्याने व्यर्थ बडबड करू नये. बडबड करायचीच असेल तर,ती संत ज्ञानोबारायांसारखी करा.ज्ञानोबाच्या मुखातून ‘ज्ञानेश्वरी ‘हा अद्वितीय ग्रंथ तयार झाला तद्वतच पैशाने माणसाचे भविष्य बदलत नाही.तर,प्रारब्ध बदलायला सद्गुरूचीच कृपा लागते,असे प्रतिपादन शिवपुराण कथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमीत्त शेवगाव शहरातील खंडोबानगर मैदानावर आयोजीत शिव महापुराण कथेमध्ये ४ थे पुष्प गुंफतांना समाधान महाराज शर्मा बोलत होते.

यावेळी उंदरगाव ता.करमाळा येथील सद्गुरु मनोहर मामा भोसले,श्रीक्षेत्र हनुमान टाकळी,ता.पाथर्डी येथील हनुमान देवस्थानचे रमेश आप्पा महाराज,माजी आमदार पांडुरंग अभंग,सौ.निलीमा नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील, डॉ. क्षितिज घुले पाटील आदी उपस्थित होते.कथा नियोजन समिती पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे सर्व श्रोते व अतिथिंनी तोंड भरून कौतुक केले.
शर्मा महाराजांनी रुद्र संहिता,कुमार खंड तसेच गणेश कार्तिकेय चरित्र सविस्तरपणे विशद करून शास्त्राचा आधार घेत ते म्हणाले,जो कोणी भगवान शंकराची निंदा करतो त्याला चंद्र सूर्य असेपर्यंत नरकात राहावे लागते. ही वेळ मनुष्यमात्रावर येऊ नये यासाठी सद्गुरु चरणांची लिन होऊन परमार्थ साधावा.सद्गुरूंचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये.
आजच्या भरकटलेल्या तरुणाईला संदेश देताना ते म्हणाले, जीवनात मोठे व्हायचे असेल तर, रात्रीचे मित्र कमी करून पहाटेशी संगत करा. पहाटे निरव शांतता असते. भगवंताचा वास असतो.भरपूर अभ्यास करा यश निश्चित मिळेल.युवतींनी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू नये तसेच हिंदू संस्कृतीचे पतन होईल,असे कोणतेही वर्तन करू नये,असा सल्ला त्यांनी दिला.
सद्गुरु मनोहर महाराज भोसले म्हणाले,समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीत प्रचंड सामर्थ्य आहे.त्यांच्या मुखात साक्षात सरस्वती वास करते.हे मौलिक वैभवशाली गोड रत्न टिकून राहावे.त्यांची सर्वत्र कीर्ती व्हावी,यासाठी मी काशी विश्वेश्वरांकडे प्रार्थना करतो. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या संदर्भात मनोहर मामा म्हणाले की, ज्याला वेळ कळली, त्याची वेळ नक्की येते घुले कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या शिवपुराण कथेच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.त्यामुळे त्यांच्या पदरात साररुपी फळ नक्की मिळेल.महादेव त्यांचे मनोरथ पूर्ण करतील.

माजी आमदार चंद्रशेखर घुले म्हणाले की,लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवपुराण कथेला माय माऊली श्रोत्यांनी घुले कुटुंबियांवर अफाट प्रेम केल.

*घुले झाले भाऊक…

श्रोत्यांच्या उच्चांकी उपस्थितीने घुले बोलताना भाऊक होवून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले त्यांनी मंचावर नतमस्तक होत श्रोत्यांना वंदन केले. तसेच कथा नियोजन समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे त्यांनी कौतुक केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!