Sunday, May 5, 2024

तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही: सुजय विखेंचे मोठं विधान

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदासंघामध्ये मात्र भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निलेश लंके यांना एक आव्हान दिलं आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगलीय. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी

इंग्रजी निलेश लंके यांनी पाठ करून जरी बोलली तरी मी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हान सुजय विखे पाटलांनी दिलं. अहमदनगर येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूचे उमेदवार एकमेकांना आव्हान देताना पाहायला मिळत आहे. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून

दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं खुलं आव्हान भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी निलेश लंके यांना दिलं आहे.अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या

भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असं सुजय विखेंनी म्हटले आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक लक्षवेधी मतदारसंघ. त्या ठिकाणी

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पारनेरचे आमदार निलेश लंकेंना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत अधिकच रंगत आली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. सुजय विखेंनी गेल्या 10 वर्षांमध्ये नगरच्या विकासासाठी काहीच केलं नाही असा आरोप करत निलेश लंकेंनी प्रचाराची वात पेटवली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!