नेवासा/सुखदेव फुलारी
अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून नेवासा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अब्दुल हाफीस शेख यांनी कुकाणा येथे कामगार
मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील
साई श्रद्धा लॉन्स येथे कामगारांच्या न्याय हक्कासाठी अब्दुल शेख यांनी कामगार मेळावा आयोजीत केला होता. या कामगार मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक महिला व युवकांसोबत संवाद साधला समस्या जाणून घेतल्या. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशिल राहील, माझ्या एका हाकेवर येणाऱ्या तमाम कामगारांना व महिला भगिनींना युवक मित्रांना वडीलधाऱ्यांना माझा सलाम, नेहमी आपल्या न्याय हक्कासाठी लढत राहील असा शब्द श्री.शेख यांनी दिला.आपल्या पाठिंब्यावर लढणार आणि जिंकणार असा आशावाद ही श्री.शेख यांनी व्यक्त केला.