नेवासा/भेंडा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी सोसायटीच्या कार्यालयात पार पडली.यासभेत संस्थेचे श्रीसंत नागेबाबा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, भेंडा बुद्रुक असे
नामकरण करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
माजी उपसरपंच कारभारी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेत सन 2023 -24 सालचे वार्षिक हिशोब पत्रके ,ताळेबंद,नफा तोटा पत्रके वाचून मंजूर करण्यात आले.सेवकांना बोनस व जादा मेहेनताना देणे बाबत चर्चा करण्यात आली.संस्थेचे जेष्ठ सभासद भीमराज मिसाळ यांनी संस्थेचे श्रीसंत नागेबाबा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, भेंडा बुद्रुक असे नामकरण करण्याचा ठराव मांडला त्यास अशोक वायकर यांनी अनुमोदन दिले.
या सभेस सोसायटीचे अध्यक्ष अड.रवींद्र गव्हाणे,उपाध्यक्ष राजेंद्र फुलारी,सचिव रावसाहेब मिसाळ,गणेश गव्हाणे,माजी अध्यक्ष जगन्नाथ साबळे,
किसन यादव,गणपत गव्हाणे,
दत्तात्रय काळे,नामदेव निकम,सह सचिव अशोक गव्हाणे आदी उपस्थीत होते .