Sunday, December 22, 2024

नेवासा- धनगर समाज आरक्षणाकरिता दोघांनी गोदावरी नदित जलसमाधी ?

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचे दोन आंदोलकांनी आज गुरुवार दि.26 रोजी सकाळी प्रवरा संगम येथील गोदावरी नदी मध्ये जलसमाधी घेतल्याचा दाट संयश आहे. आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार अशी चिट्ठी व गाडी नदी पुलवर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस व महसूल प्रशासन या दोघांचा कसून शोध घेत आहेत.

याबाबद अधिक माहिती अशी की,
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी
मागील 9 दिवसापासून नेवासा फाटा येथे सूरु असलेल्यां आंदोलनास धनगर समाजाचे 6 आंदोलके उपोषणासाठी बसले होते. त्यामधील बाळासाहेब कोळसे रा. आडगाव ता. पाथर्डी व प्रल्हाद चोरमारे रा. छ.संभाजीनगर यांनी प्रातर्विधीला जावून येतो असे सांगुन उपोषण स्थळावरून निघून गेले व धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याला फोन केला की “आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार” असे सांगून फोन बंद केला.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे फौज फाट्यासह प्रवरासंगम येथील पुलावर पोचहले.
त्यांच्या पाठोपाठ तहसीलदार संजय बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, प्रांत सुधीर पाटील धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर हे ही घटना स्थळी पोहचले.
गोदावरी पुलावर प्रल्हाद चोरमारे यांची कार उभी असून कारच्या डॅश बोर्डवर चिठ्ठी लिहून ठेवली असून स्वतःचे मोबाईल सीटवर ठेवलेले आहेत. गाडी लॉक केलेली आढळून आली. कोळसे व चोरमारे यांचा पाण्यामध्ये शोध घेण्याचे कार्य सूरु आहे. शोध कार्यासाठी एडीआरएफ ची तूकडी बोलविन्यात आली आहे.
दरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी गोदावरी पूलावरच ठान मांडून नगर-छ संभाजीनगर महामार्ग आडविला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!