Thursday, February 12, 2026

सर्वांत मोठी बातमी:महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक! निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणू्क आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक

आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांनी पत्रकार परिषदे घेऊन दोन दिवसातील आढाव्याची आणि तयारीची माहिती दिली.दोन दिवसांच्या या दौऱ्यात आयुक्त राजीव कुमार आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाने ११ राजकीय पक्षांसोबत चर्चा केली. यात काँग्रेस,

भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आदी पक्षांचा समावेश होता.या पक्षांनी निवडणुकीसंदर्भात काही सूचना, विनंती केल्या आम्ही त्या ऐकून घेतल्या. दिवाळी सणाचा विचार करून निवडणुकांच्या

तारखांचा विचार करावा, अशा सूचना सर्वच पक्षांनी केल्याचे राजीव कुमार म्हणाले.राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून

राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. शहरातील मतदान

बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!