Thursday, February 12, 2026

भेंड़याच्या पुष्पाताई नवले महाराष्ट्र शासनाच्या कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील सौ.पुष्पाताई अर्जुन उर्फ बाळासाहेब नवले यांना राज्यपालांचे हस्ते सन 2020 चा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
विभागाचे वतीने राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कारांचे वितरण आज रविवार दि.29 सप्टेंबर रोजी  मुबंई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी येथे
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे उपस्थित झाले.
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील सौ.पुष्पाताई  अर्जुन उर्फ बाळासाहेब नवले यांनी केळी, आले आणि कांदा तसेच हरबरा, तूर, इत्यादी पिकांमध्ये उल्लेखनीय उत्पादन घेऊन परिसरातील महिला शेतकऱ्यांमध्ये आदर्श निर्माण केल्यांबद्दल त्यांना 2020 चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविन्यात आले आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!