Saturday, December 21, 2024

पाचेगावचे मोहन तुवर यांचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मान

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी) येथील मोहन गंगाधर तुवर यांना राज्यपालांचे हस्ते सन २०२० चा कृषिभूषण (सेंद्रिय शेती) देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे वतीने राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कारांचे वितरण आज रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी  मुबंई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी येथे
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे उपस्थित झाले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव(कारवाडी) येथील मोहन गंगाधर तुवर यांना सेंद्रिय तंत्रज्ञानाचा अवलंब व प्रसार करून कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याप्रित्यर्थ
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन गौरविन्यात आले आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!