नेवासा
नेवासा तालुक्यातील रस्तापूर गावच्या म.गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अरुण सावंत यांची निवड झाली आहे.
रस्तापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच हिराबाई कोकाटे, उपसरपंच अण्णासाहेब अंबाडे, ग्रामसेवक श्री.शिंदे,सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेत अध्यक्ष पदाकरिता अरुण सावंत यांच्या नावाची सूचना नूरमहमद सय्यद यांनी केली, त्यास डॉ. भाकड यांनी अनुमोदन दिले.अरुण सावंत हे नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तसेच गावातील एक शांत संयमी व्यक्ती म्हणून त्यांची रस्तापूर मध्ये ओळख आहे.
सावंत यांच्या निवडी बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले .