Saturday, December 21, 2024

शेतकऱ्यांना ५ ऑक्टोबरला चार हजार मिळणार  नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं ५ ऑक्टोबरला होणार वितरण

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ताच्या वितरणासह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान १८ वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा

५ वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच नमोच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने २ हजार २५४ कोटी रुपयांच्या निधी वितरणास सोमवारी (ता.३०) मान्यता दिली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते जमा होणार आहेत.देशभरातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना जून महिन्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसानच्या १७ व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने वितरित केला होता. तर नमोच्या ४ थ्या

हप्त्याचं वितरण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारनं घाई गडबडीत निधीला मंजुरी दिली होती. तसेच घाई गडबडीने निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांना

नमोचा चौथा हप्ता मिळाला नाही, अशी शेतकरी तक्रार करत होते. आता मात्र राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्त्याचे वाटपही ५ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अवघ्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे राज्य

सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन कापूस अनुदान वाटप, पीकविमा, मदत निधी देणारे शासन निर्णय काढले जात आहेत. परंतु अंमलबजावणीत आखडता हात घेतला जातो. लोकसभा निवडणूकीत महायुतीला शेतकऱ्यांनी जोरदार

दणका दिला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत दणका बसू नये, यासाठी महायुती सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!