नेवासा
तालुक्यातील जेऊर हेबत्ती येथील अंबादास गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उत्तर नगर कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
मुबंई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या निवडीचे पत्र देण्यात आले. अंबादास गायकवाड यांच्याकडे कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आल्याने निश्चितपणे जिल्ह्यातील कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम ते करतील व पक्षाचे संघटन वाढवतील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अब्दुल शेख यांनी केले.
गायकवाड म्हणाले की, पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासास नक्कीच पात्र राहील. पक्षवाढीसाठी काम करणार आहे. गायकवाड यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी नेवासे तालुक्यात फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.