Thursday, May 14, 2026

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत गोंडेगावचा पै.अभिजित वाघूले ठरला उपविजेता

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने कळंब, ता. आंबेगाव येथे आयोजित केलेल्या
२० वर्षा खालील फिस्टाईल- ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत
नेवासा तालुक्यातील गोंडेगावचा
पै.अभिजित भाऊसाहेब वाघूले
ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटातून उपविजेता ठरला आहे.

भारतीय कुस्ती संघाशी संलग्न असलेल्या
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने कळंब, ता. आंबेगाव येथे ५ व ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या २० वर्षा खालील फिस्टाईल, ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.त्यात गोंडेगाव येथील पै.अभिजित भाऊसाहेब वाघूले हा
ग्रिकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ७२ किलो गटातून उपविजेता ठरला आहे.

त्याच्या या विजयाबद्दल गोंडेगाव मधील नागरिकांनी त्याची भव्य मिरवणुक काढून सत्कार केला. मधुकर वाघुले, रंगनाथ शेजुळ, संतोष रोडगे, अमोल गारुडे, मोहन रोडगे, पांडुरंग रोडगे, दिगंबर वाघुले, पिलाजी वाघुले, पांडुरंग तुपे, अनिल सुसे, अनिल शेजुळ, सतीश शुळ, राजेंद्र पाठक, देवेंद्र वाघुले, शिवाजी ब्राम्हणे, अशोक रोडगे, संतोष गारुडे, सागर पवार, महेश तुपे,रवी आढागळे, अक्षय वाघुले, बापूसाहेब रोडगे, ज्ञानेश्वर वाघुले, सौरव वाघुले, किशोर वाघोले, सुभाष पवार, दत्तू पवार,अक्षय सोलट, अंबादास तुपे, नवनाथ वाघुले, रामेश्वर वाघुले, संतोष वाघुले, तुकाराम वाघुले, कारभारी वाघुले, रोहिदास सुसे, ज्ञानेश्वर सुसे, गौरव आढागळे, अक्षय गारुडे, प्रदीप जाधव, सोमनाथ रोडगे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!