Friday, January 3, 2025

लेखी आश्वासनाने सौंदाळा सरपंचांचे उपोषण मागे

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील वडाळा ते सौंदाळा रस्ता डांबरीकरणणाचे काम तातडीने करावे या मागणीसाठी सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तहसीलदार व
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्याने चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यातील वडाळा ते सौंदाळा रस्ता डांबरीकरणणाचे काम २०१९ मध्ये मंजूर असलेला वडाळा ते सौंदाळा रस्ता अद्याप झालेला नाही रांजणगाव हद्दीत काम अपूर्ण असून सौंदाळा हद्दीत दिड किमी रस्ता कामच सुरु केलेलं नव्हते.
तब्बल ५ वर्ष काम सुरु ना करणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने का केली नाही त्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने सुरु केलेच पाहिजे. सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सरपंच शरद आरगडे यांनी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयातच उपोषण सुरु केले होते.या उपोषणास पाठिंबा म्हणून सौंदाळा ग्रामस्थ धरणे आंदोलन करत होते.परंतु ३ दिवस होऊन देखील प्रशासनाने कुठलीच दखल ना घेतल्याने आज सोमवारी दि ७ रोजी ११ वाजता ग्रामपंचायत समोर सर्व ग्रामस्थ व महिला प्रशासनाच्या नावाने जागरण गोंधळ करण्यात आले.
त्यांची दखल घेऊन तहसिलदार डॉ.संजय बिरादार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता श्री. सुरेश दुबाले यांनी सदरच्या रस्त्याचे काम दिड महिन्यात पूर्ण करू व यावेळेत काम न झाल्यास सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल असे लेखी दिल्याने व क्रशरची अतिरिक्त वाहतूक इतर मार्गे न्यावी असे सांगितल्यावर सरपंच शरदराव आरगडे यांनी उपोषण मागे घेतले.
परिविक्षाधिन प्रांतधिकारी विशाल यादव, मंडळधिकारी श्रीमती सरीता मुंढे, बाळासाहेब आरगडे, काॅ.बाबा आरगडे, गणेश गव्हाणे,डॉ. ईश्वर उगले,संजय गोरे, लेखी आश्वासनाने सौंदाळा सरपंचांचे उपोषण मागे

नेवासा

नेवासा तालुक्यातील वडाळा ते सौंदाळा रस्ता डांबरीकरणणाचे काम तातडीने करावे या मागणीसाठी सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तहसीलदार व
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्याने चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यातील वडाळा ते सौंदाळा रस्ता डांबरीकरणणाचे काम २०१९ मध्ये मंजूर असलेला वडाळा ते सौंदाळा रस्ता अद्याप झालेला नाही रांजणगाव हद्दीत काम अपूर्ण असून सौंदाळा हद्दीत दिड किमी रस्ता कामच सुरु केलेलं नव्हते.
तब्बल ५ वर्ष काम सुरु ना करणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने का केली नाही त्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने सुरु केलेच पाहिजे. सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठी सरपंच शरद आरगडे यांनी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयातच उपोषण सुरु केले होते.या उपोषणास पाठिंबा म्हणून सौंदाळा ग्रामस्थ धरणे आंदोलन करत होते.परंतु ३ दिवस होऊन देखील प्रशासनाने कुठलीच दखल ना घेतल्याने आज सोमवारी दि ७ रोजी ११ वाजता ग्रामपंचायत समोर सर्व ग्रामस्थ व महिला प्रशासनाच्या नावाने जागरण गोंधळ करण्यात आले.
त्यांची दखल घेऊन तहसिलदार डॉ.संजय बिरादार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता श्री. सुरेश दुबाले यांनी सदरच्या रस्त्याचे काम दिड महिन्यात पूर्ण करू व यावेळेत काम न झाल्यास सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल असे लेखी दिल्याने व क्रशरची अतिरिक्त वाहतूक इतर मार्गे न्यावी असे सांगितल्यावर सरपंच शरदराव आरगडे यांनी उपोषण मागे घेतले.
परिविक्षाधिन प्रांतधिकारी विशाल यादव, मंडळधिकारी श्रीमती सरीता मुंढे, बाळासाहेब आरगडे, काॅ.बाबा आरगडे, गणेश गव्हाणे,डॉ.ईश्वर उगले, संजय गोरे, सचिन आरगडे, वसंत बोधक, हरीभाऊ आरगडे, भिवसेन गरड, गणेश आरगडे , विशाल बोधक, लक्ष्मण आरगडे, सुनील आरगडे, मधुकर आरगडे, ज्ञानदेव आरगडे,मंजु आढागळे, बाबासाहेब बोधक, भारत आरगडे तसेच आदी महीला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!