Monday, March 30, 2026

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?फडणवीस-शिंदेंचे ग्रह प्रबळ, ज्योतिषाचार्य पांडव गुरुजींचं मोठ विधान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वाचे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी सध्या कोणत्या नेत्यांचे ग्रहमान चांगले

आहे आणि कोणासाठी चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे, याबाबतही भाष्य केले आहे.ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचे भाकीत वर्तविताना राजकीय पक्षाचे बळ, पक्षप्रमुखाचे ग्रहमान आणि तो

उमेदवार किती प्रबळ आहे, यावर अनेक गोष्टी ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांचे बळ काठावर आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीनुसार त्यांचे ग्रह प्रबळ आहेत. तर उद्धव ठाकरे यांची

कुंडली संमिश्र ग्रहमान दर्शवित आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचेही ग्रहमान चांगले असून त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगल्या जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार राज्यात पुन्हा महायुती सरकारच

सत्तेत येईल, असा अंदाज ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी वर्तविला आहे.वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी हे सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे प्रचंड व्यग्र आहेत. निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेते कुंडली शुद्ध करुन घेतात.

त्यासाठी बगलामुखी, सुदर्शन याग, शतचंडी हे यज्ञ आणि बटुक भैरव यासारखी अनुष्ठानं करण्याकडे नेत्यांचा कल आहे. इच्छाशक्ती, स्वबळ आणि आकर्षण वाढवण्यासाठी हे अनुष्ठान केले जाते. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभमुहूर्त शोधण्यासाठीही राजकीय नेते

ज्योतिषांकडे जात आहेत. ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या कुंडलीचाही अभ्यास केला आहे. यावरुन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी काही भाकितं वर्तविली आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!