नेवासा
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे २२० केव्ही विज उपकेंद्रातून जाणाऱ्या दहिगावने फिडरवरील विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौंदाळा येथील शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केला आहे.सदर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावा अशी मागणी सरपंच शरदराव आरगडे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांचेकडे केली आहे.
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात सरपंच श्री. आरगडे यांनी म्हंटले आहे की,नेवासा तालुक्यातील सौंदाळा या ठिकाणी पारेषण कंपनीचे २२० केव्ही विज उपकेंद्र आहे. त्यामुळे सौंदाळा परिसरामध्ये पोल टॉवर यांचे खूप मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झालेले आहेत. सौंदाळा गावाच्या हद्दीमधे २२० केव्ही विज उपकेंद्रातून इतर ठिकाणी जाणारी किंवा येणारी विज यासाठी उभे केलेले टॉवरसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी शेतकर्याची कूठलीही परवानगी घेतली जात नाही. त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही. सदर बाबतीत त्यांनी विरोध केला तर त्यांचेवर पोलिसाकडून दाबाव आणला जातो गुन्हे दाखल केले जातात. तसा प्रकार संजय रामहारी ठुबे या शेतकर्याच्या बाबतीत घडला आहे.
तसेच गोवर्धन निवृत्ती आरगडे यांच्या शेतामधे यापूर्वी विजेचा बिघाड होऊन त्यांचे मालकीचा ऊस व जनावरांचा चारा पेटला होता. त्यांचे झालेले नुकसान बाबत कुठलीही दखल सदर कंपनीने घेतलेली नाही. दहिगावने,ता.शेवगाव येथील फिडरची विज श्री.आरगडे यांचेच शेतामधून गेलेली आहे. त्यावर झालेला फॉल्ट काढणेसाठी बुधवार दि. २३/१०/२०२४ रोजी आलेल्या ७ कर्मचार्यांनी त्यांच्या कांदा या पिकाच्या रोपाची मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याचा जाब विचारला असता ७ कर्मचार्यांनी गोवर्धन निवृत्ती आरगडे, शरद गोवर्धन आरगडे, भारत गोवर्धन आरगडे यांना मारहाण करून त्यांचेवरच प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्यात शरद गोवर्धन आरगडे यास अटक झाली आहे. तरी त्यांचेवरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा.
अशा पद्धतीने गुन्हा दाखल करून महावितरण कर्मचारी त्यांचे संघटने मार्फत पोलीसावर दवाब आणून कारवाई करण्यास भाग पाडत आहे. अशा पद्धतीने शेतकर्यावर अन्याय होत असेल तर आपण स्वत: या बाबतीत लक्ष घालून शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा सौंदाळा ग्रामस्थ सदर प्रश्नावर तीव्र आंदोलन करतील व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.