Monday, March 30, 2026

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुलेंचा कॉर्नर बैठकांचा धडाका

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकांचा धडाका सुरू आहे.

बुधवार दि.६ नोव्हेंबर रोजी शेवगाव तालुक्यातील राणेगाव, शिंगोरी, अंतरवाली बुद्रुक, अंतरवाली खुर्द, चेडे चांदगाव , बेलगाव येथे कॉर्नर बैठक संपन्न झाल्या.
अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर मारूतराव घुले पाटील आणि शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

परिवर्तनाचे बिगुल वाजले असून शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून आज नागरिकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद आणि त्यांचे प्रेम पाहून विजयश्री आपलीच असेल, यात शंकाच नाही असा विश्वास चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केला.

काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, एकनाथ कसाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!