नेवासा
नेवासा विधानसभा मतदारसंघातील ६१९ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे द्वितीय प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी ४७४ कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान केले.
नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व रामलीला लॉन्स येथे झालेल्या प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भेट देत पोस्टल मतदान प्रक्रियेची पाहणी केली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय बिरादार, नायब तहसीलदार किशोर सानप, सोनाली मात्रे, समन्वयक अधिकारी विकास थोटे व विशाल यादव आदी उपस्थित होते
या प्रशिक्षण सत्रास निवडणूक निर्णय अधिकारी उंडे यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली, टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्ज व नमुने यांचा अहवाल भरणे, मतदान संकलन केंद्रावर ईव्हीएम तसेच मतदान साहित्य ताब्यात घेणे, सूचीनुसार साहित्य तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी करणे, मतदान केंद्र उभारणी करणे, अभीरूप (मॉकपोल) मतदान घेणे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
ईव्हीएम मशीनच्या वापराबद्दल आणि त्याच्या हाताळणीबद्दल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बिरादार यांनी प्रशिक्षण दिले.