Friday, December 27, 2024

सदगुरु प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे उद्या गुहा येथे आगमन सोमनाथ गुरूजी कुलकर्णी यांनी दिली माहिती

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे.अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांच्या परतीच्या पंढरपूर ते अमळनेर वारीचे दिंडीचे व सद्गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे आगमन राहुरी तालुक्यातील गुहा येथे ग्रामाचार्य श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांचे निवासस्थानी मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी होत आहे या कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या कुलकर्णी कुटुंबातील सदस्यांना कडून सुरू आहे.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता दिंडीचे कुलकर्णी गुरूजी यांच्या घरी आगमन झाल्यानंतर नित्य पुजा पाठ,मंगल आरती, दुपारी आलेल्या भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे. सायंकाळी चार वाजता हरीपाठ व सायंकाळी भजन होणार आहे. बुधवारी 11 डिसेंबर रोजी पहाटे आरती, पूजा पाठ व त्यानंतर सकाळी गुहा येथील भक्तांच्या घरी पान सुपारी कार्यक्रम होऊन दिंडी पुढे मार्गस्थ होणार आहे.

अमळनेर ते पंढरपूर आषाढी वारी करून चातुर्मासात पंढरपूर येथेच वास्तव्य करून, विविध नित्यनेम, पूजा अर्चा भजन कीर्तन,पंढरपूर ते अमळनेर अशी कार्तिक वारी पायी प्रवास करून वारीची परंपरा खऱ्या अर्थाने जपणारी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख दिंडी आहे. संत सखाराम महाराज यांच्या रूपाने व भक्तीने खानदेशातील अंमळनेर हे प्रति पंढरपूरच झालेले आहे. वर्षातील आठ महिने फिरस्ती व पंढरपूर येथे चातुर्मासात वास्तव्य, पहाटे काकड्यापासून ते शेजारतीपर्यंत परंपरेतील अतिशय शिस्तबद्ध व काटेकोरपणे नियमांचे पालन महाराज व दिंडी करत असते. सद्गुरु प्रसाद महाराज हे या गादीवरील अकरावे सतपुरुष आहेत.

प्रत्यक्ष पांडुरंगाने प्रसाद रुपी दिलेल्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा होते. पंढरीच्या पांडुरंगाला ज्या विशिष्ट खुणा मूर्तीवर आहेत त्या सर्व खुणा या महाराजां जवळील मूर्तीवर आहेत.संस्थानमार्फत अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम वर्षभर राबविले जातात. पंढरपूरला ज्या जाणाऱ्या मानाच्या दिंड्या आहेत त्यापैकी अमळनेरकर महाराजांची दिंडी ही शेकडो वर्षाची परंपरा असलेली दिंडी आहे. आपल्या अनेक भक्तांना उपदेश मार्गदर्शन करून सदभक्तीला लावून जीवनाचे कल्याण महाराजांनी केलेले आहे. देश विदेशात महाराजांचे शेकडो भक्त आहेत. वारकरी संप्रदायात अंमळनेरकर महाराज हे श्री रामानुजन परंपरेतील नित्यनेम व सांप्रदायिक परंपरा जपणारे म्हणून विख्यात आहेत. अशा या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपणाऱ्या दिंडीचे व सद्गुरूंचे आगमन गुहा गावचे ग्रामचार्य श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांचे निवासस्थानी आगमन होणार आहे. तरी कृपया सर्वांनी देवदर्शन व सद्गुरु दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सोहम गुरूजी कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!