माय महाराष्ट्र न्यूज भेंडा.”दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”अशा जयघोषासह पुष्पवृष्टी व शंखाचा निनाद करत नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजता भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.दत्तजयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविकांनी देवगड येथे हजेरी लावून भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले.
दत्तजयंतीच्या दिवशी शनिवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी मंदिरासमोरील कीर्तन मंडपात पुष्पांनी सजविलेल्या व्यासपीठावर पाळणा ठेवण्यात आला होता. पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रयांची मूर्ती ठेवण्यात आली होती.विधिवत पूजन झाल्यानंतर वेदमंत्राच्या जयघोष पुष्पवृष्टी करत भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली.नेवासा येथील गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला त्यांना यांनी त्यांना साथ दिली.
दत्तजयंती निमित्ताने पहाटे ४ च्या सुमारास गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.अभिषेक प्रसंगी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न ग्रामपुरोहित शरदगुरू काटकर,भेंडे येथील आचार्य गणेशदेवा कुलकर्णी आदी ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
शनिवारी सायंकाळी झालेल्या श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबाजींच्या मातोश्री सरुआई पाटील,व स्वामींच्या मातोश्री सौ.मीराबाई मते पाटील,महंत कैलासगिरीजी महाराज, महंत ऋषिनाथजी महाराज,विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे, हभप डॉ.जनार्धन मेटे महाराज, खासदार भाऊसाहेब वाकचौरे,नेवासा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.