नेवासा
श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अनिल कदम,भरत दारुंटे,अक्षय काळे,निलेश वैद्य आणि आदिनाथ गर्जे या चार अधिकाऱ्यांना पदोनोन्नती देण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी दिली.
असिस्टंट जनरल मॅनेजर अनिल कदम यांना मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ),लीगल ऑफिसर भरत दारुंटे यांना जनरल मॅनेजर, रिजनल ऑफिसर अक्षय काळे यांना सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी (असिस्टंट सीईओ), शाखाधिकारी निलेश वैद्य एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर तर शाखाधिकारी आदिनाथ गर्जे यांना एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर पदी पदोनोन्नती देण्यात आली आहे.
सामाजिकता जपत कॉर्पोरेट वाटचाल करणाऱ्या नागेबाबा मल्टिस्टेटचे प्रभावी नेतृत्व करतील आणि त्यांचे कार्य नागेबाबा मल्टिस्टेटला अधिक उंचीवर घेऊन जाईल हा सार्थ विश्वास असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे तज्ञ संचालक संचालक फिरोदिया यांनी दिली.