नेवासा
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील व्यापारी सतिष हरकचंद भंडारी यांच्या कॉम्पलेक्स समोर असलेले धान्य चोरून नेणाऱ्या तीघांना नेवासा पोलीसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की, सतिष हरकचंद भंडारी (वय 56 वर्षे) धंदा व्यापार रा. शेवगांव रोड,कुकाणा ता. नेवासा यांनी नेवासा पो.स्टे.ला दि. 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी फिर्याद दिली की, आज दि.16 जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे पहाटे 4.00 वाजेचे सुमारास मी उठलो व कॉम्पलेक्स समोर असलेले धान्य पाहणेसाठी गेलो असता माझे दुकाना जवळून दोन मोटारसायकलवर चार इसम धान्य घेवुन पळून जाताना दिसले. खात्री करता 20 हजार रुपये किमतीचे तुरीचे धान्य अंदाजे 300 किलो चोरुन नेले आहे वगैरे या फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे. गुरन. 41/2025 भा.न्या.सं.क. 303(2) प्रमाणे ता. 16/1/2025 रोजी 08.52 वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात कुकाणा गावातील आजोनाथ राजु तांबे रा. कुकाणा ता. नेवासा ह.रा.तरवडी ता. नेवासा, विजय दत्तात्रय घोडके रा-दहिगांव रोड कुकाणा ता. नेवासा, शाहरुख दगडु पठाण रा. झोपडपटटी कुकाणा ता. नेवासा व भैय्या उर्फ नदीम निजाम अत्तार रा. कुकाणा ता. नेवासा अशांनी केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या गुन्ह्यातील यांची नावे खात्रीशीर बातमीदाराकडून मिळाल्यानंतर आरोपीचा शोध घेत असत पेट्रोलिंग दरम्याण आरोपी आणि पोलीसांची समोरा समोर नजरा नजर झाली असता, आरोपी पळून जावु लागले. त्यानंतर पोलीस स्टेशन नेवासा कडील पोकॉ हरी धायतडक व पोकॉ संतोष खंडागळे यांनी आरोपीचा गल्ली बोळातून पाठलाग करुन शिताफीने पकडले.
त्यानंतर आजीनाथ राजु तांबे रा. कुकाणा ता. नेवासा ह.रा. तरवडी ता. नेवासा, विजय दत्तात्रय घोडके रा-दहिगांव रोड कुकाणा ता. नेवासा व शाहरुख दगड्डु पठाण रा. झोपडपटटी कुकाणा ता. नेवासा अशांना पकडुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिलेली असुन नमुद आरोपीतांकडून सदर गुन्हयात चोरलेल्या मालापैकी 6 हजार 600 रुपये किंमतीचे 100 किलो तुर धान्य, 20 हजार रुपये कि.ची एक
बिगर नंबरची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटार सायकल, 25 हजार रुपये किंमतीची बिगर नंबरची हिरो स्पेलंडर कंपनीची मोटार सायकल, 51 हजार 600 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या असुन सदर गुन्हयातील वर नमूद तीन आरोपीतांना गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच ता. 16/1/2025 रोजी 10.59 वा. अटक करण्यात आलेली असुन त्यांची न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
धान्य चोरीचे अशा प्रकारचे गुन्हे यापुर्वी देखील घडलेले असुन नेवासा पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. या गुन्ह्यात देखील या आरोपींचा काही सहभाग आहे किंवा कसे याबाबतचा सखोल तपास देखील करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरमपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पो.स.ई. शैलेंद्र ससाणे, पोना. बी. बी. काळोखे, पोकों. हरी घायतडक, चापोकों, संतोष खंडागळे, पोकों संदिप ढाकणे, पोकॉ. ज्ञानेश्वर रसाळ अशांनी केलेली आहे.