Sunday, May 17, 2026

जबरीने लुटलेले सोने नेवासा पोलिसांनी फिर्यादीस केले परत

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील देडगाव येथील एका महिलेचे जबरीने लुटलेले १३ ग्रॅम सोने नेवासा न्यायालयाच्या आदेशाने नेवासा पोलिसांनी फिर्यादीस परत केले आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास केला होता.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ४ डिसेंबर २०२४ रोजी तुमच्या नावे बँकेत मोदीचे पैसे आले आहेत. ते मी तुम्हाला काढून देतो. मी बँकेचा माणूस
मी बँकेचा माणूस आहे असे म्हणून त्याने वयस्कर फिर्यादी महिला नामे साखरबाई नामदेव कुटे रा. देडगाव ता. नेवासा यांना त्याचे मोटर सायकलवर बसवून देवगाव कारेगाव रोडवर शिवारात नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन गळ्यातील १३ ग्रॅम वजनाच्या दोन पोथी व कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून नेल्याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. सदरच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी आरोपी विरुद्ध जबरीची चोरी असा गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासाकडील पोलीस उपनिरीक्षक भोंबे हे करीत असताना पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, पोलीस कॉन्स्टेबल फाटक यांनी देडगाव परिसरातील सीसीटीव्हीची छाननी करून आरोपी नामे युवराज प्रकाश गजरे रा. भेंडा ता. नेवासा हा निष्पन्न केला होता. आरोपी लपून छपून राहून काही दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु पोलिसांनी सदर गुन्ह्यात आरोपीस सिताफिने अटक केली होती. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीने जबरीने चोरलेले सोने कुकाणा स्थित सराफास विकले होते. आरोपीस सराफी दुकानात घेऊन जाताच विकत घेतलेले सोने काढून दिले. तपासा दरम्यान पोलिसांनी जप्त केलेले सोने परत मिळवण्यासाठी फिर्यादी महिला यांनी नेवासा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. सदर अर्जानुसार गुन्ह्याच्या तपासात जप्त केलेले सोने परत करण्यास कोणतीही हरकत नसल्याबाबत पोलिसांनी न्यायालयास कळवले होते. त्यानुसार गुन्ह्यात जप्त केलेले सोने फिर्यादीस परत करण्याबाबतचा न्यायालयाने आदेश दिला होता. त्यानुसार गुन्ह्यामध्ये जप्त केलेले १३ ग्रॅम सोने आज रोजी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांचे उपस्थितीत फिर्यादी यांना परत करण्यात आले याबाबत फिर्यादीने समाधान व आनंद व्यक्त केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!