Thursday, July 31, 2025

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्त्वाचे- मा.आ.नरेंद्र घुले पाटील

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

खेळामुळे सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

भेंडा येथे जिजामाता महाविद्यालय व रणविर क्रीडा मंडळ भेंडा यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे वतीने आयोजीत केलेल्या ८५ किलो वजन गटातील पुरुष व ७५ किलो वजन गटातील महिला संघाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उदघाटन श्री.घुले यांचे हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. काशीनाथ नवले, बबनराव भुसारी,अशोकराव मिसाळ, अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनचे प्रदेश सरचिटणीस सुखदेव फुलारी, अंबादास कळमकर, गणेश गव्हाणे, सोपान महापुर, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे,प्राचार्य सोपानराव काळे,प्रा.दत्तात्रय वाकचौरे,
सचिन अंधारे, प्रो-कबड्डी खेळाडू शंकर गदाई,अजित पवार, अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सहसचिव विजय मिस्कीन,सदस्य कैलास पठारे,राष्ट्रीय मार्गदर्शक व सदस्य शंतनु पांडव,माजी जिल्हा क्रीड़ा अधिकारी अजय पवार, प्रमुख पंच गीताराम पवार,शिवाजी वाबळे,पंजाब शिंदे,प्रा.नबिलाल सय्यद, बंडू घोडेचोर, आदि यावेळी उपस्थित होते.

श्री.घुले पुढे म्हणाले की, खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे तसेच खेळामुळे खेळाडूंचे भविष्य उज्वल होते.आपल्या मन आणि बुद्धीला निकोप आणि सक्षम ठेवण्याचे कार्य खेळामुळे होते. खेळात खिलाडू वृत्तीला महत्व आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता खेळामुळे निर्माण होते.

नगर जिल्ह्यातून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी निवड  चाचणी स्पर्धेसाठी पुरुष गटाचे १२ संघ तर महिला गटाचे ५ संघ सहभागी होते.अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सचिव शशिकांत गाडे व खजिनदार प्रकाश बोरुडे यांनी सांयकाली ५ वाजता स्पर्धेला भेट दिली.
या स्पर्धेमधून निवडलेले संघ दि. १९ ते २३ मार्च रोजी ठाणे येथे होणाऱ्या ७२ वी वरीष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!