Thursday, February 12, 2026

तक्षशिला ज्युनियर कॉलेज देडगाव- बारावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील देडगाव येथील मन्वंतर संस्थेच्या तक्षशिला ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२५ च्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉलेजचा एकूण निकाल ९५.९९% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

या परीक्षेत कु. कदम दिव्या दत्तात्रय हिने ७१.५०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. चि. खैरे कुणाल भाऊसाहेब याने ७१.३३% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर चि. वांढेकर प्रसाद रविंद्र याने ७०.६७% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. चि. ढाकणे युवराज सुदाम याने ६९.३३%* गुण मिळवले.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय साहेबराव कदम, संचालिका सौ. शुभांगी विजय कदम, प्राचार्य विनुल भाऊसाहेब कदम, उपप्राचार्य संदीप आप्पासाहेब खाटिक तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा मोलाचा आहे. हे यश भविष्यातील उज्वल वाटचालीस प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास प्राचार्य विठ्ठल कदम यांनी व्यक्त केला आहे.या विद्यार्थ्यांना अशोक पवार पूनम चिमखडे मयुरी पवार मनीषा अवताडे गणेश नांगरे मोहिनी कर्डिले कल्पना पवार सविता पिसाळ संदीप खाटीक या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!