Friday, February 13, 2026

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अर्थसहाय्याच्या योजना नाशिक विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नाशिक

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकात्ता यांच्याकडून संपूर्ण देशात सार्वजनिक ग्रंथालयांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, मुंबई मुख्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक या कार्यालयाच्या वतीने नाशिक विभागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, ग्रामपंचायत ग्रंथालये यांचेसाठी दि.१५ व १६ मे २०२५ रोजी २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले आहे.

नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह, के.टी.एच.एम. कॉलेज जवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे होणाऱ्या सदर विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. प्रवीण गेडाम, मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेहस्ते गुरुवार दि. १५/०५/२०२५ रोजी होणार आहे. सदर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष स्थान मा. श्री. अशोक गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई हे भूषविणार आहेत. उद्घाटन सत्रामध्ये ग्रंथालय संचालनालय, मुंबई कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली नाशिक विभागस्तरीय कार्यशाळा पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यशाळेस शासनमान्य राज्य, विभाग व जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व नाशिक विभागातील १४०० हून अधिक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व ग्रंथालय सेवक उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकात्ताच्या समान निधी व असमान निधी योजना व राष्ट्रीय ग्रंथालय अभियान, नवी दिल्ली यांचेकडून देशातील ग्रंथालयांना विविध योजनांच्या माध्यमातून जे लाभ दिले जातात यावर पश्चिम क्षेत्रीय अधिकारी श्री. अनंत वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत. मा. श्री. विवेक सोनुने, धर्मादाय सह आयुक्त-१, नाशिक विभाग, नाशिक हे “ग्रंथालयांना न्यास नोंदणी कार्यालयाशी संबंधित कामकाजात येणाऱ्या अडचणी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी दि.१६ रोजी ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली (LGMS) मध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी वार्षिक अहवाल व अंकेक्षण अहवाल कसा भरावा, NIC, New Delhi यांनी विकसीत केलेली ई-ग्रंथालय आज्ञावलीचा सुलभ वापर करणे याबाबत डॉ. विजयकुमार जगताप हे मार्गदर्शन मिळणार आहे.

प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार सर “प्रभावी वाचन सवय विकसीत करण्यामध्ये ग्रंथालयांची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. “हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथांचे जतन संवर्धन करणे” या विषयावर श्रीमती अनिता जोशी या तज्ञ मार्गदर्शक ग्रंथालय प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत. “बौध्दिक संपदा अधिकार आणि ग्रंथालये” या विषयावर सार्वजनिक ग्रंथालयांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक विभागातील शासनमान्यता प्राप्त १४०० हून अधिक ग्रंथालयाचे कार्यकर्ते, ग्रंथालय पदाधिकारी व ग्रंथालय सेवक यांनी सदर कार्यशाळेत सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालय, नाशिक व सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यलय, नाशिक विभाग, नाशिक यांचे वतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!