Thursday, April 2, 2026

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीची शहादा येथे बैठक

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक
दि.३१ मे ते १ जून या कालावधीत शहादा जि.नंदुरबार येथे होणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष विष्णु गायकवाड यांनी दिली.

शहादा येथे होत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठकीच्या नियोजनासाठी दि.१५ मे रोजी सांयकाली ७ वाजता अहिल्यानगर जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक जिल्हा कार्याध्यक्ष विष्णु गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली व राज्य प्रधान सचिव ठकसेन गोराणे,राज्य सरचिटणीस अड.रंजना गवांदे यांचे प्रमुख उपस्थितित संपन्न झाली.
जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा व देवदत्त साळवे,प्रसिद्धि व सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाह सुखदेव फुलारी, बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह शशिकांत गायकवाड, निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह प्राचार्य अशोक गवांदे,अनिल माने, मल्हारी खेडकर, रामचंद्र जाधव, संतोष माने आदींसह इतर पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी बोलताना विष्णु गायकवाड यांनी सांगितले की, दि.३० मे ते १ जून रोजी शहादा, जि.नंदुरबार येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा (लोणखेडा) येथे विस्तारित राज्य कार्यकारणी बैठक होत असल्याचे सांगून महाराष्ट्र अंनिसचे सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, निमंत्रित, सर्व जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव आणि शाखा कार्याध्यक्ष, प्रधान सचिव व इच्छुक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव आणि सर्व शाखांचे कार्याध्यक्ष,सचिव व इच्छुक प्रमुख कार्यकर्ते यांनी पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सदर बैठक शुक्रवार दि. ३० मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि रविवार दि.१ जून रोजी दुपारच्या भोजनानंतर बैठक संपेल असे सांगून सर्वानी तीन ही दिवस पूर्ण उपस्थित रहावे असे आवाहन केले.
राज्य प्रधान सचिव ठकसेन गोराणे,राज्य सरचिटणीस अड.रंजना गवांदे यांनी ही मार्गदर्शन केले.
अनिल माने यांनी प्रेरणा गीत सादर केले.
जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी प्रस्ताविक केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!