Tuesday, March 31, 2026

क्रांतीदीप कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथाचे गुरुवारी प्रकाशन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

अहिल्यानगर हमाल पंचायतचे दिवंगत नेते शंकरराव घुले गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण व हमाल पंचायतचे जेष्ठ मार्दर्शक कॉ. बाबा आरगडे यांच्या जीवना वरील “क्रांतीदीप-कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ” प्रकाशन गुरुवार दि. १२ जुन २०२५ रोजी स. ११ वाजता पदमश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हमाल पंचायत, मार्केट यार्ड, अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.

येथील सौंदाळा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे हे गेल्या अनेक वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, जीप चालक-वाहक संघटना,कामगार सुरक्षा बोर्ड , भारतीय कम्युनिस्ट पक्ष यासह विविध संस्था व संघटनांमध्ये मार्गदर्शकाची भूमिकका पाडत आहेत. कॉ. बाबा आरगडे वयाच्या ८० व्या वर्षाकडे पदार्पण करत असल्याने
त्यानिमित्त सुनील गोसावी यांनी संपादित केलेल्या “क्रांतीदीप-कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ” या ग्रंथाचे प्रकाशन होणार होत आहे. महाराष्ट्र आता सध्या राज्य अध्यक्ष माधव बागवे,प्रधान सचिव ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह अड.रंजना गवांदे हे ही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!