Saturday, May 16, 2026

बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनार्थ प्रहारचे नेवासा फाट्यावर चक्काजाम आंदोलन

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन मिळावी या मागणीसाठी ८ तारखेपासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा सहा दिवस उलटून देखील सरकारने मागण्या मान्य न केल्याने नेवासा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवार दि.१४ रोजी सकाळी १० वाजता नेवासा फाटा येथे अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर राजमुद्रा चैकात चक्काजाम आंदोलन केले.दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अड.पांडुरंग औताडे यावेळी बोलताना म्हणाले.

शनिवार दि.१४ रोजी सकाळी १० वाजता आंदोलकांनी अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेवगाव चौकामध्येच ठाण मांडले होते.
प्रहारचे जिल्हाप्रमुख माऊली सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष ऍड.पांडुरंग औताडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे यांनी भाषणे
केली.

यावेळी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष ऍड.पांडुरंग औताडे म्हणाले की, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यांच्यावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांनी मतदान केले. त्यांनी या गोष्टीची जाणीव न ठेवता शेतकऱ्यांना झुलविण्याचे काम केले. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर आंदोलकांची अंत्ययात्रा काढण्यापेक्षा या सरकारची अंत्ययात्रा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

शेतकरी विभाग प्रमुख रघुनाथ आरगडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, धरणग्रस्त विभाग नागनाथ आगळे, उपाध्यक्ष पांडुरंग नवले, राजेंद्र कळसकर, सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ नवले, युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे, अरविंद आरगडे, युवक प्रमुख विकास कोतकर, नेवासा शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, सचिन साबळे प्रताप उभेदळ अमोल जोगदंड, सोमनाथ सांगळे सुनील शेजुळ, सतीश विधाटे, शेतकरी संघटनेच्या वतीने हरिअप्पा तुवर, मेजर काळे,डॉ.कुलकर्णी,ऍड.शिरसाठ, स्वाभिमानी त्रिंबक भदगले, तालुकाध्यक्ष शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना गणपत मोरे, भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य, शेषराव गव्हाणे, जीवन ज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले, एड. जैत शेख, उद्योजक दत्तात्रय खाटीक, दिगंबार आवारे, राजेंद्र चामूटे, बाबासाहेब कोतकर, बंडू आरगडे, रामकिसन चामूटे, शंकर टकले. व परिसरातील शेतकऱ्यांनी बच्चुभाऊच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मंडळअधिकारी सरीता मुंडे यांनी निवेदन स्वीकारले.
नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपअधीक्षक संतोष खाडे ,पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे पोलीस फौजफाट्यासह उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!