नेवासा
नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील उद्योजक शिवाजीराव पाठक यांच्या पसायदान उद्योग समुह संचालित नेवासा फाटा येथील कॅफे दुर्गाचा सौ.धनश्रीताई सुजय विखे पाटील व सौ.तेजस्विनी क्षितिज घुले पाटील यांचे हस्ते शानदार शुभारंभ झाला.
सोमवार दि.१४ जुलै रोजी सकाळी १० वाजता नेवासा फाटा परिसरातील राजमुद्रा चौकात नव्याने सूरु करण्यात आलेल्या कॅफे दुर्गा या नवीन दालनाच्या शुभारंभ प्रसंगी नजीक चिंचोली येथील खड़ेश्वरी मंदिराचे महंत
गणेशानंदगिरीजी महाराज, मुकिंदपुरच्या लोकनियुक्त सरपंच
सौ.सौ.कल्पनाताई सतीश निपुंगे,
माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,डॉ.शिवाजीराव शिंदे, नामदेवराव निकम, डॉ.संतोष फुलारी, पत्रकार सुखदेव फुलारी,अशोकराव वायकर,
आदी यावेळी उपस्थित होते.
माजी आ.पांडुरंग अभंग, सौ.सुनीताताई गड़ाख, सौ.दुर्गाताई तांबे,सौ मैथिलीताई तांबे यांनी सदिच्छा भेट दिली.
उद्योजक शिवाजीराव पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाऊसाहेब शेटे यांनी प्रस्ताविक केले. डॉ. रेवनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.किशोर भणगे यांनी आभार मानले.