नेवासा/प्रतिनिधी
नेवासा येथे दि. २१ जुलै २०२५ रोजी कामिका एकादशी निमीत्ताने पैस खांबाचे दर्शनाकरीता येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने नेवासा शहरातील वहातुक मार्गात बदल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
नेवासा खुर्द येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदीर येथे कामिका एकादशी निमीत्ताने लाखो भाविक पैस खांबाचे दर्शनाकरीता येत असतात. या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर दिवशी नेवासा फाटा ते नेवासा बुद्रुक या रोडवर पायी चालणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहील. तसेच शेवगाव ते श्रीरामपुर मार्गावरील वाहतुकीमुळे पायी चालणाऱ्या भाविकांना वाहनाचा धक्का लागुन अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर परीसरातील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक असल्याने दि.२१ जुलै २०२५ रोजी कमिका एकादशी निमित्त नेवासा शहरातील वाहतुकीत खालील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.
*१)नेवासा फाटा ते श्रीरामपुरकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग*
i) नेवासा फाटा- प्रवरासंगम- सिद्धेश्वर मंदिर- वाशिम टोका- गोधेगाव- भालगांव- नेवासा बु. – टाकळीभान- श्रीरामपुर
*२) श्रीरामपुर ते नेवासा फाटा ते शेवगावकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग*
i) श्रीरामपुर- टाकळीभान- नेवासा बुद्रुक- भालगाव- गोधेगाव- वाशिम टोका- सिध्देश्वर मंदिर-प्रवरासंगम- नेवासा फाटा- शेवगाव
वरील आदेश शासकीय वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.
*पार्किंग (वहान तळ) व्यवस्था*
भक्त भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे…
१)नेवासा फाट्याकडून येणाऱ्या वाहन करता कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटीचे) ग्राउंड
२) श्रीरामपूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा
३) राहुरी खूपटीकडून येणाऱ्या वाहनांसाठी खूपटी रोड वरील ईदगाह मैदान
४) केवळ दुचाकी वाहनांसाठी नेवासा शहरात एस.टी. स्टँड, पंचायत समिती मैदान आणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
स्थानिक रहिवाशांनी २१ जुलै रोजी चार चाकी वाहनांचा उपयोग टाळावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.