नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील त्रिमूर्तीच्या पावन प्रतिष्ठान मधील शालेय विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन विरोधात जनजागृती करणारा कार्यक्रम संपन्न झाला. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान महाविद्यालय खडका ता.नेवासा या शाळेत अमली पदार्थाचे सेवन विरोधात जनजागृती कार्यक्रम घेऊन उपस्थित मुला-मुलींना नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अमली पदार्थाचे सेवन व त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम तसेच सोशल मीडियाचा चांगला व वाईट वापर, महिलांविषयी कायदे तसेच नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शाळेतील प्राचार्य, शिक्षक बहुसंख्येने हजर होते.