दि.15-8-25 पुणे
जखमी अवस्थेतील कुत्रे, मांजर, गाय, बैल असे प्राणी पाहिले कि, अनेकजण मनातून हळहळतात. रस्त्यात एखाद्या गाडीखाली सापडलेला मृत प्राणी दिसला कि, चालक अस्वस्थ होऊन त्याला वळसा घालून जातात, या दोन्ही घटना मध्ये स्वतः हुन मदत करण्यास कोणी पुढे येत नाही.
ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न पुणे येथील शिवपुजा फौंडेशन करीत आहे.
शिवपुजा ऍनिमल केअर हाऊस (SACH) ही सामाजिक स्वयंसेवी संस्था अविरत मुक्या प्राण्यासाठी लढत आहे.. सन 2022 पासून या संस्थे मार्फत प्राण्यांच्या प्राथमिक उपचार, दत्तक घेणे, नसबंदी आणि निवारा या सोयी सुविधा मुके प्राणी जसे कुत्रे, मांजर, गाय, बैल यांना पुरवीत आहे..
आता पर्यंत तब्बल 300 भटक्या कुत्र्यांचा व 460 मांजरीचा सांभाळ, 500पेक्षा जास्त प्राण्याचे लसीकरण व उच्च दर्जाचा वैद्यकीय उपचार संस्थेने केला आहे.
shivpoojafoundation.org असे गुगल वर सर्च केल्यावर आपण या सामाजिक संस्थेने निरपेक्ष पणे, प्रकाश झोतात न येता करीत असलेले भरीव कार्य आपल्या नजरेस पडते.
भटक्या प्राण्याची सुटका करणे, निवारा उपलब्ध करून देणे, आजारी, अपघात ग्रस्त प्राण्यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इ सुविधा ही संस्था अविरत पूर वित आहे. ‘ पशु सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीद वाक्यातून या संस्थेच्या कार्या ला केवळ सामाजिक जाणिवेतुन वाहून घेतलेले, पडद्या मागून, निरपेक्ष कामासाठी झोकून घेतलेले, स्वयं सेवी मंडळी निःस्वार्थ भावनेतून काम करीत आहे..
आपण सुद्धा यांच्या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलू शकतो.
संस्थेच्या देणगी या वेबसाईट वर क्लीक केल्यावर शिवपुजा फौंडेशन चा खालील बँक खाते तपशील येतो.
ऍक्सिस बँक, मांजरी शाखा, पुणे
बँक खाते नं- 925010028475494.
IFSC – UTIB0003831.
या शिवपुजा फौंडेशन चे प्राण्यांसाठी निवास स्थान हे – गट नं-304, शिवालय फार्म, मुळापूर, ग्राम पंचायत पोम गाव, मुळशी तहसील, पुणे- 412108 येथे भेट देऊन संस्थेचे सामाजिक काम पाहू शकता.
शिवपुजा फौंडेशन या कामासोबत डोंगर दऱ्यात जाऊन वृक्षारोपण करणे,प्लास्टिक बंदी, पर्यावरण संवर्धन या कार्यात देखील सतत कार्यरत आहे..
चला तर मग, एका सामाजिक चळवळीचा भाग बनु यात..
-प्रसाद वाघ(नेवासा)