नेवासा
पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो. समाजातील सुख दुःखाची पत्रकारांना जाणीव असते. समाजातील प्रश्न व समस्या मांडण्याचे व त्या सोडवीण्याचे काम पत्रकार करतात, पत्रकारच सुसंस्कृत समाज घडवीतात असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.
नेवासाचे जेष्ठ पत्रकार अॅड.बाळासाहेब तनपुरे पाटील यांनी लिहीलेल्या ‘कटूसत्य, या आत्मचरित्राचे प्रकाशन
१५ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र देवगड येथील यात्री निवास सभागृहात भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. नाशिकच्या कालीका मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, पत्रकार भाई सोनार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विजयाताई अंबाडे, सौ.विमलताई तनपुरे, भागवतराव मुठे, बापुसाहेब पटारे व्यासपीठावर होते. विश्वासराव तनपुरे, नानासाहेब तनपुरे, भागिरथ तनपुरे, अथर्व तनपुरे, प्रतिक तनपुरे, रामकृष्ण तनपुरे, नितीन तनपुरे, शिवाजीराव कवडे, प्रशांत कवडे, मुरुमे गावचे सरपंच अजय साबळे, डॉ.ऋषीकेश निगळ यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
भास्करगिरी महाराज पुढे म्हणाले की, पत्रकार बाळासाहेब तनपुरे हे जसे उत्तम पत्रकार आहेत तसे सिद्धहस्त साहीत्यीकही आहेत. निर्भिडपणे व सत्त्य लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. काही गोष्टी लिहिता बोलता येत नाही, मात्र समाजाचा आणि राष्ट्रहिताचा विचार करून काही वेळा सत्य हे कटूपणाने का होईना मांडावेच लागते.
त्यांचे कटूसत्य हे आत्मचरित्र वाचकांना निश्चितच आवडेल. उनिवांचा फारसा विचार न करता नेवासा तालुक्यातील पत्रकारांनी तालुक्याचा विकासाचा विचार करत अध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक डौल सांभाळलेला आहे,असे ही ते म्हणाले.
रामायणाचार्य नंदकिशोर खरात महाराज म्हणाले, बाळासाहेबांनी घराचे घरपण, गावाचे गावपण व माणसाचे माणुसपण जपले. यातून त्यांना जो अनुभव आला तो म्हणजे ‘कटूसत्य’ आत्मचरित्र.
प्रास्ताविक करतांना साहित्यिक प्रा.बाबूराव उपाध्ये म्हणाले की,
सत्यदर्शन हा आत्मचरित्राचा आत्मा आहे. अंतरंगापासून लिहिलेले हे आत्मचरित्र आहे.यात बाळासाहेबांनी
जीवनाच्या वाटचालीचा मागोवा घेतलेला आहे. कटुसत्य आत्मचरित्र हे मानवी संस्कृतिच्या मुल्यांचा धागा आहे.
विजयाताई अंबाडे,पुस्तकाचे लेखक बाळासाहेब तनपुरे,कु.अन्वी तनपुरे, कु.संस्कृती तनपुरे, बाळकृष्ण भागवत यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संभाजीराव कारले, बाळासाहेब निगळ, नानासाहेब अंबाडे, सौ.रोहिणीताई तनपुरे, सौ.पुप्षाताई तनपुरे, सौ.भक्तीताई तनपुरे, आनंद सोनवणे, कृष्णा कदम, प्रकाश थेवरकर, भाऊसाहेब बानकर, गणेश कवडे, संदीप दांगट, दगडू बडाख, यशवंत तुपे, बाळासाहेब अडसुळे, रामदास गावंडे, सोनु साबळे, पत्रकार विनायक दरंदले,सुखदेव फुलारी,गुरुप्रसाद देशपांडे, अशोक डहाळे, सुनिल गर्जे, रामदास कोरडे, बाळासाहेब गवळी, नाशिकचे विजय पाटील, भास्कर शिंदे, बाळासाहेब गायकवाड, सत्यजित पाटील, यश कवडेे, राजेंद्र कहांडळ, अभिषेक दरंदले यांचे सह पत्रकार साहित्यीक उपस्थित होते.
प्रारंभी प्रतापराव तनपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा.संगीता फासाटे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. अॅड.भारत कवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.