राहुल कोळसे गुहा:ज्ञानवर्धनि सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. यामध्ये राधा कृष्ण म्हणून भरपूर मुलांनी वेशभूषा सादर केली. विशेषता एलकेजी, युकेजी, फर्स्ट स्टॅंडर्ड, सेकंड स्टॅंडर्ड वरील प्रायमरी सेक्शन च्या मुलांनी राधा कृष्णाचे वेशभूषा मोठे आकर्षण ठरलं. मुलांनी राधा कृष्णाच्या गाण्यावरती ठेका धरत सर्वांची मने हिरावली व मोठा आनंद घेतला. पालकांनी विशिष्ट मेहनत घेत आपल्या मुलाचा शाळेमध्ये कृष्ण व राधा वेशभूषा मध्ये प्रथम क्रमांक कसा येईल यासाठी भरपूर परिश्रम घेतले. ज्या मुलांचा या वेशभूषा मध्ये प्रथम क्रमांक येणार आहे त्या विद्यार्थ्यास शाळेच्या गॅदरिंग मध्ये विशेष बक्षीस दिले जाते.
राधाच्या वेशात स्वरा वरखडे, अवनी गाडे, आरोही जगताप, गायत्री शिंदे, तनिष्का गाडे, आरोही उरे, पियुशा शेलार, स्वरा गागरे, संस्कृती मुसमाडे, संस्कृती गागरे, सृष्टी शिनारे, तर कृष्णाच्या वेशामध्ये शंभू गागरे, प्रदक्ष शेलार, पृथ्वीराज मुसमाडे, सचिन गागरे, हर्षवर्धन मुसमाडे, संकेत ढेपे, यांनी वेशभूषा केली. सेकंडरीच्या मुलांनी दहीहंडी फोडण्यासाठी मोठी उत्सुकता होती. त्यात गोविंदा म्हणून कार्तिक अरगडे ने दहीहंडी फोडली.
कार्यक्रमाचे नियोजन सौ जयश्री पागिरे व क्रीडा शिक्षक सौरभ वरखडे यांच्याकडे होते. त्यांना विशेष सहकार्य औदुंबर कडू, अमोल तोडमल, रवींद्र गागरे, चंद्रकांत कदम, अरुण सर, नामुअल रायता, अरुण पारखे, सुजाता कोळसे, कल्याणी मुसमाडे, गीतांजली डोंगरे, राजश्री भांड, शीतल जाधव ऋतुजा लांबे. अमोल साळुंके, विकास सौदागर, नामदेव कोळसे, सोमनाथ नरोडे, सुनील मुसमाडे, यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम नियोजनबद्ध झाल्यामुळे संस्थेचे संस्थापक ज्ञानदेव शेलार , सेक्रेटरी मनीषा शेलार शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले.