Friday, May 15, 2026

गिडेगाव शिवरातील अवैध दारू विक्री बंदीसाठी महिला आक्रमक

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/ प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील गिडेगाव शिवरातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी गिडेगावच्या महिलांनी केली असून याबाबंद नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.या मागणीवर कोणतीही कारवाई न केल्यास महिला गिडेगाव ग्रामपंचायत समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.

नेवासा तालुक्यामधील गिडेगाव येथील अवैद्य दारू विक्रीवर बंदी घालण्यासाठी गिडेगाव येथील महिला पुढे सरसावल्या असून त्यांनी
नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दारूबंदी करणे बाबत निवेदन दिले.
या निवेदना सोबत गिडेगाव ग्रामपंचायतीच्या २८ ऑगस्ट १२०२५ 2 रोजीच्या ग्रामसभेचा दारू अनधिकृत दारू बंदीच्या ठरावाची प्रत जोडण्यात आली आहे.या ठरावावर सूचक म्हणून सौ.अंजली कल्याण साळुंके यांची तर अनुमोदक म्हणून सौ कविता अरुण ताकवले यांच्या सह्या आहेत.

निवेदनावर अंजली साळुंके ,कविता ताकवले,कविता साळुंके ,कडुबाई कर्डिले, शीला साळुंके ,नंदाबाई कर्डिले, मीना कदम, सिंधुबाई कदम, शालिनीबाई पाथरकर, मनीषा साळुंके ,शांताबाई बोरुडे ,उज्वला साळुंके,हर्षदा साळुंके, सुशिलाबाई साळुंके,सविता बोरुडे, सविता माळी, निर्मला गायकवाड ,अनिता माळी, सुशीला गायकवाड, जनाबाई ठोकळ राणी चव्हाण ,कविता ठोकळ ,शितल चव्हाण, लता राठोड, शोभा चव्हाण ,मीरा चव्हाण, पारूबाई चव्हाण ,ताराबाई चव्हाण , सोनाली गायकवाड, सुनिता ताकवले ,मीना साळुंके ,प्रयागाबाई साळुंके ,रंजना साळुंके ,रोहिणी साळुंके, छायाबाई गायकवाड ,शांताबाई कर्डिले ,सविता ताकवले ,संजीवनी भूमकर, गिडेगाव गावातील आदी महिलांच्या सह्या आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव,स्थानिक गुन्हे शाखा, उत्पादन शुल्क अधिकारी नेवासा यांना
निवेदनाच्या प्रती पाठवीण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!