राहुल कोळसे:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्क्वॅश & रॅकेट स्पर्धे मध्ये 22 शाळांनी भाग घेतला होता यामध्ये राहुरी तालुक्यातील गुहा येथील ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी समृद्धी ज्ञानदेव शेलार 17 वयोगटात प्रथम क्रमांक मिळवत मागील वर्षीप्रमाणे विभागीय स्तराला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी तिला प्राप्त झाली आहे तसेच द्वितीय क्रमांक गौरी नानासाहेब शेलार ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक मिळवत विभाग स्तरावर तिची निवड झाली आहे. दोन्ही मुलींची विभाग स्तरावर निवड झाल्याने राहुरी तालुक्यात संपूर्ण खेळामध्ये ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलचा प्रथम क्रमांक चा दबदबा पाहावयास मिळत आहे.
विद्यालयाचे खेळाचे शिक्षक सौरभ वरखडे यांच्या प्रत्येक खेळाचे मार्गदर्शन अचूक करत तालुक्यात प्रथम क्रमांक चे क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात. पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार व सेक्रेटरी मनीषा शेलार, उपाध्यक्ष संभाजी हरण ,मार्गदर्शक संचालक मेजर चंद्रकांत सौदागर , माजी मुख्याध्यापक वसंतराव जाधव, शाळेचे प्राचार्य औदुंबर कडू ,उपप्राचार्य अरुण पारखे, कोऑर्डिनेटर अमोल तोडमल, अर्जुन मुसमाडे, विकास सौदागर, सोमनाथ नरोडे ,शितल जाधव, केतकी सिनारे, जयश्री पागिरे, अलका कोळसे, सुजाता कोळसे, गीतांजली गावडे, राजश्री गाडे, पियुशा शेलार ,रवींद्र गागरे ,नामदेव कोळसे यांनी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.


